
“राजकारण विरहित सामाजिक बांधिलकी जोपासणारा आगरी समाजातील एकमेव दूरदृष्टी तरुण नेता राजू पाटील होय !” ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण येथील मौजे काटई गावचे सुपुत्र माजी आमदार राजू पाटील यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्र राज्याला ज्ञात आहे.”एकच वादा आमचा राजुदादा” या गाण्याने तर राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात माजी आमदार राजुदादा पाटील यांना लोकप्रियता मिळवून दिली. ठाणे…
ठाणे (जिमाका) : आदिवासी समाज देव,देश, धर्मावर विश्वास ठेवून कार्य करणारा समाज आहे. आदिवासी समाजाची आदर्श व लोकप्रिय संस्कृती जिवंत राहिली पाहिजे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी आज येथे केले. आदिवासी स्वातंत्र्यवीर राघोजी भांगरे यांच्या 177 व्या स्मृतीदिनानिमित्त ठाणे येथील कारागृहामध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार संजय केळकर,…
“पालकांनी शाळेची मान्यता तपासूनच प्रवेश घ्यावा असे शिक्षण विभागाचे आवाहन” ठाणे (जिल्हा परिषद,ठाणे) : ठाणे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागात काही शाळा शासनाची आवश्यक मान्यता न घेता अनधिकृतरीत्या शिक्षण संस्था चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालकांनी प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेची मान्यता व नोंदणी क्रमांक तपासावा, असे आवाहन शिक्षण विभाग (माध्यमिक) ललिता दहितुले यांनी केले आहे….
“अभियानाचा ग्रामपंचायतींमध्ये उत्साहात सुरूवात” ठाणे (जिल्हा परिषद,ठाणे) : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यात “कंपोस्ट खड्डा भरू,आपलं गाव स्वच्छ ठेवू!” या विशेष स्वच्छता अभियानाला १ मे, २०२५ रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. हा उपक्रम राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत राबविण्यात येत आहे. या अभियानाचा…