
प्रतिनिधी -अमित कांबळे
मुंबई : ओबीसी व कुणबी युवा,सत्यशोधक शिवप्रवर्तक यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त विधवा महिलांना मंगळसूत्र व अलंकार भेट देण्याचा विशेष उपक्रम आयोजित केला आहे.
प्रबोधनकार,कार्यविधीकार, सत्यशोधक शिवप्रवर्तकाचे प्रणेते, माझी पोलीस अधिकारी, माननीय मारुतीकाका जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.


या कार्यक्रमाच्या उद्घाटक सौ.दिपिकाताई आग्रे (सचिव- कुणबी महिला संघ मुंबई) असणार आहेत.तसेच या विशेष कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या आयु.मनीषाताई आनंदराज आंबेडकर,सौ.चंदाताई जाधव (उप.आयुक्त म.न.पा),सौ.गौतमी ताई जाधव (प्रणाली सेवाभावी संस्था),ऍड.रोशनदादा पाटील, श्री.ज्ञानेश्वर सकपाळ (नाबार्ड -लोकांधिकार समिती मुंबई),श्री.गजानन सुवारे (नायब तहसीलदार) प्रसंगी प्रमुख उपस्थिती श्री भगवान साळवी (रिपब्लिकन सेना),सौ प्रतिभा साळुंखे (रेल्वे पोलीस अधिकारी),श्री सचिन रामाने (स्टार प्रचारक),श्री.राजाराम ढोलम, श्री. किसन डिके,श्री.चंद्रकांत नेवरेकर,प्रकाश (भाई) जोशी (रिपब्लिकन सेना,अध्यक्ष,रमाई आदर्श महिला मंडळ ओशिवळे),बाबू गुळेकर (गाव प्रमुख),रामचंद्र पालकर (सेवानिवृत्त पोलीस),ऍड.रूपाली मदन खळे (समाजसेवक),श्री विलास डिके (अध्यक्ष- सत्यशोधक शिवप्रवर्तक,कार्यकर्ते),श्री.गणपत भायजे,श्री.भास्कर पवार,श्री.रवी मते, सौ.राजश्री ढोलम,श्री.संतोष चांदे,श्री.किरण डिके,श्री.अनंत मांडवकर (वंचित बहुजन आघाडी उपजिल्हा अध्यक्ष रत्नागिरी),श्री. चेतन नाईक (वंचित बहुजन आघाडी, उपजिल्हा अध्यक्ष रत्नागिरी),श्री.कृष्णा बाईग (गावकर ),श्री.हरिराम वर्मा (युपी),श्री.सचिन रामाने (स्टार प्रचारक),प्राध्यापक श्री संदीप येलये.तसेच कुणबी युवा चे कार्यकर्ते सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमा प्रसंगी भिक्खुनी विजया मैत्रिय लिखित “राजा बळी आमचाच आहे” या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे,त्याचे मराठी भाषांतर अक्षय शिंपी यांनी केले आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन- कुणबी युवा चे युवराज कांबळे करणार आहेत.
सदर कार्यक्रम शनिवारी ८ तारखेला,सकाळी १० ते दुपारी ०२ वाजेपर्यंत.कुणबी,समाजोन्नती संघ मुंबई,ज्ञाती गृह (वाघे सभागृह ),सेंट झेविअर स्ट्रीट,परळ,मुंबई क्र-१२ येथे पार पडणार आहे.
====================
ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज
संपादक : जी.डी.कदम,उपळेकर
बातम्या,व जाहिरातीसाठी संपर्क :
8451951623/8879986087
======================