“महाराष्ट्र दिन”

आम्ही सर्व एक । महाराष्ट्रीयन ।
जुळविले मन। शांतीसाठी ॥ १॥

महाराष्ट्र माझा । सौंदर्याची खाण ।
निसर्गाचं दान । चोहिकडे ॥ २ ॥

शिवाजी राजांचे। हिंदवी स्वराज्य।
प्रजेचे सुराज्य । महाराष्ट्री ॥ ३ ॥

फुलेंनी पुण्यात । शिक्षण देऊन ।
घडविले जन । महाराष्ट्री॥ ४ ॥

शाहू महाराज । जनप्रीय राजे ।
बहुजन राजे । महाराष्ट्री ॥ ५॥

गाडगेबाबांचा । स्वच्छता संदेश |
शिक्षण संदेश | महाराष्ट्री ॥ ६ ॥

ग्रामगीता वाणी । ग्रामा नि ग्रामात ।
थोर राष्ट्रसंत । महाराष्ट्री ॥ ७ ॥

महाराष्ट्र दिनी । करू या नमन ।
करांनी वंदन । हुतात्म्यांना ॥ ८ ॥

      – अभंगकार – 
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
भ्र.ध्व. :८०८७७४८६०९
====================
ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज
संपादक : जी.डी.कदम,उपळेकर
बातम्या,व जाहिरातीसाठी संपर्क :
8451951623/8879986087
======================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Click to Whatsapp