डोंबिवली : मानपाडा रोड वरील दामू पार्क सोसायटी येथिल रहिवाशी व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची वारंवार स्पीड ब्रेकर तसेच रस्त्यामधील खड्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या हा रस्ता वर्दळीचा असल्यामुळे येथे जेष्ट नागरिक तसेच लहान मुलांची येजा सुरूच असते मात्र या रस्त्यावर वाहने भरधाव वेगाने धावत असतात आणि अति वेगाला आळा घालण्यासाठी कुठेही स्पीड ब्रेकर नसल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता होती या गोष्टीच गांभीर्य वेळीच ओळखून आज संघवी गार्डन,युनियन बँक तसेच दामू पार्क समोर नागरिकांच्या मागणी नुसार स्पीड ब्रेकर आणि रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण करून घेतले व नागरिकांनी या कामासाठी समाधान व्यक्त करून रहिवाश्यांनी आमदार राजेश मोरे यांचे आभार मानले.
====================
ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज
संपादक : जी.डी.कदम,उपळेकर
बातम्या,व जाहिरातीसाठी संपर्क :
8451951623/8879986087
======================
दामू पार्क सोसायटीतील रहिवाश्यांनी मानले आमदार राजेश मोरे यांचे आभार…
