Site icon globalmaharashtra24news.in

जिल्हास्तरीय सल्लागार समिती बैठक संपन्न

ठाणे (जिमाका) : ठाणे जिल्हा सल्लागार समितीची तिमाही बैठक,जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली दि.३ मार्च २०२५ रोजी पार पडली.रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या अग्रणी बँक (लीड बँक) योजनेअंतर्गत विविध विकासात्मक उपक्रम राबविण्यात समन्वय साधण्यासाठी बँकर्स तसेच सरकारी संस्था/विभागांसाठी जिल्हा पातळीवर एक सामान्य मंच म्हणून सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला जिल्हा सल्लागार समित्यांची स्थापना करण्यात आली.    
     
जिल्हाधिकारी हे जिल्हास्तरीय सल्लागार समिती बैठकांचे अध्यक्ष असतात.रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया,नाबार्ड,जिल्ह्यातील लघु वित्त बँकांसह सर्व व्यावसायिक बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (डीसीसीबी) , आरआरबी,पेमेंट बँका,विविध राज्य सरकारी विभाग आणि संबंधित संस्था समिती चे सदस्य असतात. लीड डिस्ट्रिक्ट ऑफिसर (एलडीओ) समिती चे सदस्य म्हणून रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधित्व करतात.जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक (एलडीएम) समिती ची बैठका आयोजित करतात.
      
दि.०३ मार्च २०२५ रोजी आयोजित बैठकीसाठी श्री.अभिषेक पवार,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक,ठाणे,श्री.अरुण बाबू,रिजर्व बँक ऑफ इंडिया,मुंबई,श्री,सुधांशुकुमार  अश्विनी,नाबार्ड,छायादेवी शिसोदे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,ठाणे,रामेश्वर पाचे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी,ठाणे,सोनाली देवरे,महा व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र,ठाणे, श्रीकांत पठारे,मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जि.म.स.बँक  तसेच ठाणे जिल्ह्यातील विविध बँक जिल्हा समन्वय अधिकारी उपस्थित होते.   
     
या बैठकीमधे जिल्हा पत पुरवठा आराखडा 2024-2025 चा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनी घेतला.
   
क्षेत्रनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे :

कृषी क्षेत्र – वार्षिक लक्ष(रु.कोटी) – 4000, वितरण(डिसेंबर 2024 अखेर)- 3316,साध्य टक्के – 83.
सूक्ष्म,लघु मध्यम उद्योग (MSME) क्षेत्र – वार्षिक लक्ष (रु.कोटी) – 30000, वितरण(डिसेंबर 2024 अखेर)- 25997, साध्य टक्के – 87.
इतर प्राधान्य क्षेत्र – वार्षिक लक्ष (रु.कोटी) – 5500, वितरण(डिसेंबर 2024 अखेर)- 36716, साध्य टक्के – 67. प्राधान्य क्षेत्र – वार्षिक लक्ष (रु.कोटी) – 39500, वितरण(डिसेंबर 2024 अखेर) – 32989, साध्य टक्के – 84.
प्राधान्य क्षेत्र व्यतिरिक्त इतर क्षेत्र – वार्षिक लक्ष (रु.कोटी) – 83500, वितरण(डिसेंबर 2024 अखेर) – 73732, साध्य टक्के – 88.
एकूण – वार्षिक लक्ष (रु.कोटी) – 123000, वितरण(डिसेंबर 2024 अखेर) – 106722, साध्य टक्के – 87.
     
तसेच  पीक कर्ज, बचत गट कर्ज, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP), प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना (PMFME) व इतर सरकारी योजना, महामंडल कर्ज योजना यांचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी घेतला.

सर्व बँकानी त्यांना दिलेले मार्च २०२५ आर्थिक वर्षा चे उद्दिष्ट १०० टक्के साध्य करावे,अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री.शिनगारे सर्व उपस्थित बँक अधिकाऱ्यांना दिल्या.
====================
ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज
संपादक : जी.डी.कदम,उपळेकर
बातम्या,व जाहिरातीसाठी संपर्क :
8451951623/8879986087
======================

Exit mobile version