
आदिवासी समाजाची आदर्श व लोकप्रिय संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध – आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके
ठाणे (जिमाका) : आदिवासी समाज देव,देश, धर्मावर विश्वास ठेवून कार्य करणारा समाज आहे. आदिवासी समाजाची आदर्श व लोकप्रिय संस्कृती जिवंत राहिली पाहिजे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी आज येथे केले. आदिवासी स्वातंत्र्यवीर राघोजी भांगरे यांच्या 177 व्या स्मृतीदिनानिमित्त ठाणे येथील कारागृहामध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार संजय केळकर,…