तळोजा येथील काळीज पिळवटून टाकणारी घटना !…तळोजा देवीचा पाडा येथील वय वर्ष ३ मुलीची अमानुष हत्या…

“हत्या करून मृतदेह राहत्या घरी सुटकेस मध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर”

पनवेल (सतीश पाटील) : तळोजा काळीज पिळवटून टाकणारी घटना !…तळोजा देवीचा पाडा येथील वय वर्ष ३ मुलीची अमानुष हत्या करून मृतदेह राहत्या घरी सुटकेस मध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी २७ मार्च २०२५ समोर आला.

हार्षिक अमलेश शर्मा असे मृत बालिकेचे नाव असून ती मंगळवार पासून बेपत्ता झाल्याची होती.या प्रकरणात परिसरात खळबळ उडाली होती.तळोजा पोलीस ठाण्यासह गुन्हेअन्वेषण खातेही तपासात करीत होते.

मिळालेल्या माहितीनुसार मुलगी तीच्या आईवडीलासोबत देवीचा पाडा येथे राहत होती.ती मंगळवारी खेळण्यासाठी बाहेर गेली होती.त्यानंतर ती घरी आलीच नाही.शोधून झाल्यावर शेवटी आईवडीलांनी तळोजा पोलीस ठाणे गाठून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.दरम्यान गुरुवारी   राहत्या घरातील बाथरूमच्या पोटमाळ्यावर कुजकट वास येत असल्याने पाहणी दरम्यान सुटकेस मध्ये मृतदेह आढळून आला.त्वरित पोलीस ठाण्यात करण्यात आले,पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेवून पोस्टमार्टेम साठी पाठवून दिला.त्यानंतर पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून परिसरात तपास करीत असताना निष्पन्न झाले मुलाची आई चे शेजारीच राहत असलेले दाम्पत्य यांच्यात मुल खेळण्यावर वाद झाला होतो.तो राग मुलीवर काढण्यात आला.

मोहम्मद अंसारी असे आरोपीचे नाव असून असून त्याने चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली दिली.पुढील तपासासाठी पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे .या घटनेनंतर सर्व परिसरात खळबळ उडाली व हळहळ व्यक्त होत आहे काय गुन्ह्य त्या निरागस बालिकेचा खेळण्याच्या वयात या घटनेस सामोरे जावे लागले.
====================
ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज
संपादक : जी.डी.कदम,उपळेकर
बातम्या,व जाहिरातीसाठी संपर्क :
8451951623/8879986087
======================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Click to Whatsapp