ये समा,समा है ये प्यार का….

“३० मार्च: आनंद बक्षी स्मृतिदिन विशेष….”

_कविता हा त्यांचा जीव की प्राण.त्यांचे विश्वच निराळे. शब्दांच्या मळ्यात फिरणारे. हा शब्दप्रभू कवितेच्या मळ्यात खुशाल बागडायचा. अंगच्या प्रतिभेने रुपेरी पडद्याच्या दालनात त्याने प्रवेश केला. त्याने रसिकांना जिंकले.कारण त्याच्या शब्दांची जादूच तशी होती. त्याच्या लेखणीतून उतरलेल्या गीतांनी तरुणाईला झिंग आणली. आनंद बक्षी नावाच्या या गीतकाराबद्दल महत्वपूर्ण संकलित माहिती श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरुजी प्रस्तुत करताहेत….._

कलाकार बनण्याचे स्वप्न उरी बाळगणारा हा रांगडा गडी नेहमी म्हणायचा, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ध्येय हवे. आपण गायक व्हायचे, असे आनंद बक्षींच्या मनात खूप होते. मात्र त्यांच्यातील कविमनाने गायकीवर मात केली. ते गीतकार बनले आणि जन्माला आली तुमचे -आमचे जीवन फुलवणारी, अविस्मरणीय गाणी. शब्दांच्या या जादूगाराने आपल्या गीतांनी रसिकांना जणू मोहिनीच घातली. प्रेमाची ओढ असो की विरह, आई-मुलातील वात्सल्य असो की मरणाची अपरिहार्यता असो, आनंद बक्षींच्या लेखणीने या सर्व भावना रसिकांच्या मनी ठसायच्या.  
      
सन १९५८मध्ये आलेला ‘भला आदमी’ हा गीतकार आनंद बक्षींचा पहिला चित्रपट. ‘धरती के लाल न कर इतना मलाल’ हे त्यांचे पहिले गाणे.आनंद बक्षी प्रकाशझोतात आले ते ‘जब जब फूल खिले’च्या गीतांमुळे. या चित्रपटात त्यांची लेखणी अशी खुलली की तिने रसिकांची मने काबीज केली. ‘ये समा, समा है ये प्यार का’ हे यातले लताच्या आवाजातले गाणे आजही ताजे, टवटवीत वाटते. सहज ओठांवर येतील असे साधे, आशयघन शब्द, मनाला भावणा-या शब्दांची यमकालंकारात केलेली सहज-सोपी गुंफण ही आनंद बक्षींच्या गाण्यांची वैशिष्ट्ये. रसिकांच्या मनातले भाव नेमकेपणाने त्यांच्या गीतांत उतरायचे. मैत्री असो की द्वेष, प्रेम असो की मत्सर, वासल्य असो की कारुण्य, जीवनाचे तत्त्वज्ञान असो की फँटसी, आनंद बक्षींची लेखणी हे सारे भावविश्व चपखलपणे टिपायची. या सर्व भावना मग सुंदर गीतातून रसिकांच्या मनात रुंजी घालायच्या. आदमी मुसाफिर है, आता है जाता है – अपनापन मधून जीवनचक्रावर भाष्य करणारे बक्षी, इश्क बिना क्या जीना यारो- ताल हा भावही तरलपणे मांडतात. कोरा कागज था ये मन मेरा- आराधना अशी प्रांजळ कबुली देत आनंद बक्षी प्रेमाची ग्वाही देतात, तिला पाहताच दर्दे दिल दर्दे जिगर, दिल में जगाया आपने- कर्ज अशी स्पष्ट कबुली देतात. पुढच्याच पावलावर मैं शायर तो नहीं-बॉबी असे सांगत तिच्या प्रभावाचे वलय स्पष्ट करतात. शीशा हो या दिल- आशा मधून ते पुढील धोक्याची जाणीवही करून देतात.प्रेमाचा बहर संपल्यानंतरचा नैराश्य,वैफल्याचा भाव व्यक्त करताना आनंद बक्षींच्या लेखणीला जणू आगळी धारच चढते.त्यांच्या ४० गाण्यांना फिल्मफेअरमध्ये नामांकन मिळाले.चार वेळा त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. आपल्या सिद्धहस्त लेखणीने रसिकांच्या जीवनात मधुर आनंद पसरवणाऱ्या आनंद बक्षी यांना मनापासून सलाम!
         
आनंद बक्षी हे एक हिंदी गीतकार व कवी होते. त्यांचा जन्म दि.२१ जुलै १९३० रोजी आताच्या पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे काश्मीरी मोहयाल ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांची आई सुमित्रा आनंद बक्षी ते पाच वर्षांचे असतानाच वारली.त्यांचे कुटुंब भारताच्या फाळणी दरम्यान २ ऑक्टोबर १९४७ रोजी भारतात आले. डकोटा विमानातून दिल्लीला आल्यावर बक्षी कुटुंब पुणे, मेरठ आणि शेवटी परत दिल्लीत येऊन स्थायिक झाले.कविता हा ज्यांचा जीव की प्राण.त्यांचे विश्वच निराळे.शब्दांच्या मळ्यात फिरणारे.त्यात त्यांच्या वाट्याला आली लष्करातली नोकरी.लष्कराच्या कडक शिस्तीत शब्दांना अधिकच साचेबद्धता आली. ते रुक्ष वातावरण,तो युद्धाचा सराव,लष्करी कवायत अशा वातावरणात हा शब्दप्रभू कवितेच्या मळ्यात खुशाल बागडायचा.अंगच्या प्रतिभेने रुपेरी पडद्याच्या दालनात त्यांनी प्रवेश केला. त्यांनी रसिकांना जिंकले.कारण त्यांच्या शब्दांची जादूच तशी होती. त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या गीतांनी तरुणाईला झिंग आणली. गायक व्हायचे आनंद बक्षींच्या मनात खूप होते. मात्र, त्यांच्यातील कविमनाने गायकीवर मात केली. ते गीतकार बनले आणि जन्माला आली तुमचे-आमचे जीवन फुलवणारी, अविस्मरणीय गाणी. शब्दांच्या या जादुगाराने आपल्या गीतांनी रसिकांना जणू मोहिनीच घातली. प्रेमाची ओढ असो की विरह, आई-मुलातील वात्सल्य असो की मरणाची अपरिहार्यता असो, आनंद बक्षींच्या लेखणीने या सर्व भावना रसिकांच्या मनी ठसायच्या. सन १९५८मध्ये आलेला ‘भला आदमी’ हा गीतकार आनंद बक्षींचा पहिला चित्रपट. ‘धरती के लाल न कर इतना मलाल’ हे त्यांचे पहिले गाणे. आनंद बक्षी प्रकाशझोतात आले ते ‘जब जब फूल खिले’च्या गीतांमुळे. या चित्रपटात त्यांची लेखणी अशी खुलली की तिने रसिकांची मने काबीज केली. ‘ये समा, समा है ये प्यार का’ हे यातले लताच्या आवाजातले गाणे आजही ताजे, टवटवीत वाटते. सहज ओठांवर येतील असे साधे, आशयघन शब्द, मनाला भावणार्‍या शब्दांची यमकालंकारात केलेली सहज-सोपी गुंफण ही आनंद बक्षींच्या गाण्यांची वैशिष्ठ्ये. रसिकांच्या मनातले भाव नेमकेपणाने त्यांच्या गीतांत उतरायचे.

मैत्री असो की द्वेष, प्रेम असो की मत्सर, वासल्य असो की कारुण्य, जीवनाचे तत्त्वज्ञान असो की फँटसी, आनंद बक्षींची लेखणी हे सारे भावविश्व चपखलपणे टिपायची. या सर्व भावना मग सुंदर गीतातून रसिकांच्या मनात रुंजी घालायच्या.संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याबरोबर आनंद बक्षी यांचे सूर जुळले. या त्रयीने अनेक अविस्मरणीय गाणी दिली आहेत. आने से उसके आये बहार-जीने की राह, बिंदिया चमकेगी-दो रास्ते, सावन का महीना-मिलन, मैं शायर तो नहीं-बॉबी, परदा है परदा-अमर अकबर अँथोनी,आदमी मुसाफिर है-अपनापन, डफलीवाले-सरगम, ओम शांती ओम-कर्ज ही आनंद बक्षी-लक्ष्मी-प्यारे या त्रयींची काही सुपरहिट गाणी. लक्ष्मी-प्यारे यांच्याप्रमाणेच राहुलदेव बर्मन-आरडी यांच्याबरोबरही आनंद बक्षी यांचे सूर जुळले. ना कोई उमंग है-कटी पतंग, रैना बीती जाए-अमर प्रेम, महेबूबा महेबूबा-शोले,परबत के पीछे-महेबूबा, सावन के झूले पडे-जुर्माना, दम मारो दम-हरे राम ही आरडी-आनंद बक्षी यांची काही गाजलेली गाणी आहेत. कल्याणजी-आनंदजी, अन्नु मलिक,राजेश रोशन या संगीतकारांसाठीही आनंद बक्षी यांनी अनेक अविस्मरणीय गाणी दिली आहेत.

अशा या महान गीतकाराचे दि.३० मार्च २००२ रोजी निधन झाले.त्यांना आज पुण्यस्मरण दिन सप्ताहांत मनापासून सलाम !!

– संकलन व शब्दांकन –
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरुजी.
फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Click to Whatsapp