ठाणे : ठाणे महानगरपालिका मध्ये गेल्या अनेक वर्षापासून फेरीवाल्यांचा प्रश्न हा प्रलंबित होता, त्या साठी फेरीवाला उपजीविका २०१४ कायदा लागू करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत ,फेरीवाल्यांना न्याय मिळण्यासाठी फेरीवाला कायदा प्रभावी अमलात आणण्यासाठी दि. १९ मार्च २०२५ रोजी फेरीवाल्यांच्या वतीने ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी दिवा प्रभाग समितीच्या वतीने आम्हाला पत्र मिळाले ,वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमचे म्हणणे पाठवणार आहोत असे आश्वासन लिखित दिले,त्या वेळी दिवा प्रभाग समिती ला आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर ठाणे महानगरपालिका मुख्यालय कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता याच अनुषंगाने दिनांक २४ मार्च २०२५ रोजी अमोल केंद्रे,दीपक भालेराव,अभ्यालाल दुबे ,अनिल मौर्या,अरविंद कोठारी आम्ही ठाणे महानगर पालिका आयुक्त साहेबांची भेट घेऊन ,चर्चा करून फेरीवाला कायद्याच्या कलम ३ (३) नुसार जो पर्यंत सर्वेक्षण आणि लायसन्स मिळत नाही तो पर्यंत दिवा आणि ठाणे महानगरपालिका हद्दीतील कोणत्याही फेरीवाले वर कारवाई करू नये व इतर महत्त्वाची मुद्दे लिखित मध्ये निवेदन दिले. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी दि.२५ मार्चं २०२५ रोजी ठाणे महानगरपालिका ने फेरीवाल्यांच्या निवडणुका जाहीर केल्या.
नियमाच्या कलम १५ अंतर्गत निश्चित केलेल्या तारीख तीन महिन्यापूर्वी ,नोंदणीकृत पथविक्रेता (फेरीवाले) यांची मतदार यादी प्रसिद्ध करील अशी फेरीवाला नियम २०१६ नियम कलम १५ मध्ये तरतूद असताना दि. २५ मार्च २०२५ ला निवडणूक ची घोषणा आणि ११ एप्रिल २०२५ रोजी वोटींग येथे फक्त १७ दिवसाचा कालावधी दिला. तीन महिन्याचा कालावधी दिल्या नसल्याने ही फेरीवाला सदस्य निवडणूक नियमाला धरून नाही. २०१९ आणि २०१६ मध्ये फेरीवाला सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने ठाणे महानगर पालिकेने केला आपण आकडेवारी पहिल्याने स्पष्ट दिसते.६००० फेरीवाल्यांचा सर्वे झाला, मोठया संख्येने फेरीवाले असताना सर्वेक्षण मध्ये फेरीवाले कमी संख्या का? ६००० सर्वेक्षण / झालेले फेरीवाले त्यातील १६३६ फेरीवाल्यांना पात्र /अधिकृत ठाणे महानगरपालिका ने ठरवून यादी प्रसिद्ध केली , ४६३५ सर्वेक्षण झालेले फेरीवाले यांना मतदार यादतून वगळण्यात आले हा नोंदणीकृत फेरीवाले यांच्यावर अन्याय आहे,नोंदणीकृत फेरीवाल्यांना मताचा अधिकार मिळावा. सर्व नोंदणीकृत फेरीवाल्यांना कायद्याने वोटींग करता यावे अशी मागणी करण्यात आली.
फेरीवाला कायदा २०१४ च्या कलम २२ नुसार दिवा आणि मुंब्रा येथे विभाग पातळीवर स्पेशल TVC कमिटी स्थापन करावी आणि ठाणे महानगर पालिकेत मेन TVC कमिटी म्हणजे एकूण तीन TVC च्या निवडणुका घ्यावे नंतर निवडून आलेल्या TVC च्या माध्यमातून उवरीत फेरीवाल्यांचा सर्वेक्षण तात्काळ करावा. सध्या स्थितीत सर्व फेरीवाल्यांचा जो पर्यंत सर्वे होत नाही,जो पर्यंत लायसन्स मिळत नाही तो पर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई करू नये.त्यांना व्यवसाय करू द्यावा.तसेच स्वच्छतेच्या नावाने ३०रुपये पावती देण बंद करून जे हफ्ते घेतात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. ही फेरीवाला निवडणूक रद्द करून फेरीवाला निवडणूक पुढे फेरीवाला कायदा आणि नियम ला धरून घेण्यात यावी. फेरीवाल्यांना फेरीवाला उपजीविका कायदा २०१४ प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि फेरीवाल्यांच्या ज्वलंत समस्या वर दि. २ एप्रिल २०२५ रोजी ठाणे महानगर पालिका कार्यालय समोर सकाळी १० वाजता ठिय्या/धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.सदर आंदोलनात ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
अमोल केंद्रे : संस्थापक अध्यक्ष
धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य
दिपक भालेराव
सचिव: कोंकण क्षेत्र,
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पथारी,हातगाडी एसोसिएशन महाराष्ट्र राज्य. यांनी केले
अभय लाल दुबे
(धड़ाकेबाज युवा प्रतिष्ठान कार्याध्यक्ष)
राजू गुप्ता (दोस्ताना ग्रुप)
====================
ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज
संपादक : जी.डी.कदम,उपळेकर
बातम्या,व जाहिरातीसाठी संपर्क :
8451951623/8879986087
======================